Sunscreen Types And Benefits In Marathi | सनस्क्रीन म्हणजे काय? जाणून घ्या सनस्क्रीन लावण्याचे फायदे आणि प्रकार 1

Sunscreen Types And Benefits In Marathi | आजच- कालच्या या धकाधकीच्या आयुष्यात आपण स्वतःकडे लक्ष देण्याचे टाळतो. आपण नेहमीच कामाला प्राधान्य देतो. या सगळ्या गडबडीमध्ये आपण स्वतःच्या शरीराकडे कधीच लक्ष देत नाही. त्यामुळेच आपल्याला अनेक आजार उद्भवतात आणि ते खूप आपल्याला उशिरा समजतात. आपल्या शरीराचे आरोग्य जितके महत्त्वाचे आहे. तितकेच महत्त्वाचे आपल्याला आपल्या त्वचेचे आरोग्य देखील महत्त्वाचे आहे.

आजकाल त्वचेची संबंधित अनेक आजार निर्माण झालेले आहेत. ज्याचा आपल्या शरीरावर जीवघेणा परिणाम होतो. त्यामुळे आपल्या त्वचेच्या आरोग्याकडे देखील आपण तितकेच महत्त्व दिले पाहिजे. अनेकजण हे दररोज स्किनकेअर (Sunscreen Types And Benefits In Marathi) रूटीन फॉलो करत असतात. परंतु आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत, ज्यांना स्किन केअर रुटीनबद्दल काहीच माहित नाही. या सगळ्याचा त्यांच्या त्वचेवर घातक परिणाम होतो.

Table of Contents

सगळ्यात महत्त्वाचे असते, ते म्हणजे आपण जेव्हा घराबाहेर जातो, तेव्हा उन्हामध्ये जाताना सनस्क्रीन लावणे. ही सनस्क्रीन (Sunscreen Types And Benefits In Marathi) आपल्या त्वचेवर एक प्रकारचा लेयर निर्माण करते. त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांचा आपल्या त्वचेवर प्रभाव पडत नाही. आणि आपली त्वचा देखील चांगली राहते. आता हे सनस्क्रीन म्हणजे काय? त्यात असणारे एसपीएफ काय असते? या सगळ्याची माहिती आज आपण घेणार आहोत.

हेही वाचा – Skin care tips For Summer in marathi | उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, डीहायड्रेशनची समस्या होईल कायमची गायब 1

सनस्क्रीन म्हणजे काय ? What Is Sunscreen?

Sunscreen Types And Benefits In Marathi
Sunscreen Types And Benefits In Marathi

सनस्क्रीन हा आपल्या डेली स्किन केअर रुटीनमधला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सनस्क्रीन हे क्रीम बेस एक प्रॉडक्ट आहे. जे आपल्या त्वचेवर लावले जाते. या सनस्क्रीनने आपल्या त्वचेवर एक सुरक्षित असा थर निर्माण होतो. ज्यामुळे आपल्या त्वचेचे सूर्यापासून रक्षण होते. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे आपल्या त्वचेवर नेहमीच घातक असा मारा करत असतात.

त्यामुळे आपल्या त्वचेला हानी पोहोचते. कधीकधी तर त्वचेचा कॅन्सर होण्याची देखील शक्यता असते. अशावेळी जर आपण दररोज आपल्या वापरामध्ये सनस्क्रीन आणले, तर त्याचा आपल्या त्वचेला खूप चांगला फायदा होईल. या सनस्क्रीनमध्ये असणारे एसपीएफ खूप महत्त्वाचे असते. सनस्क्रीनमध्ये किती एसपीएफ आहे यानुसार त्या सनस्क्रिनचा आपल्या त्वचेला किती फायदा होणार आहे हे निश्चित केले जाते.

हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1

एसपीएफ म्हणजे काय? What Is SPF?

एसपीएफम्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे ही अल्ट्राव्हायोलेट स्वरूपामध्ये असतात. ही अल्ट्राव्हायोलेट किरणे आपल्या त्वचेवर पडून आपल्या त्वचेचे नुकसान होते. त्याचप्रमाणे या किरणांमुळे कॅन्सर यांसारखे त्वचेचे विकार होतात. आपल्या दररोजच्या वापरामध्ये एसपीएफ 30 वापरणे खूप गरजेचे आहे किंवा spf 50 देखील तुम्ही जास्त उन्हामध्ये वापरू शकता.

सनस्क्रीन वापरण्याचे फायदे | Sunscreen Types And Benefits In Marathi

Sunscreen Types And Benefits In Marathi
Sunscreen Types And Benefits In Marathi

सनस्क्रीन हे आपल्या डेली स्किन केअर रुटीनमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे आपल्या त्वचेला येणारे वृद्धत्व त्याचप्रमाणे यांसारख्या अनेक समस्या दूर होतात. आता या सनक्रिनमुळे आपल्याला काय फायदे होतात हे आपण पाहूया.

हेही वाचा – Heart Attack Symptoms And Reasons | ‘ही’ लक्षणे दिसत असतील त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क, दिसू शकतो हृदयविकाराचा धोका 0

सूर्यापासून संरक्षण

सनस्क्रीन हा सूर्याच्या अतिनील करण्यापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करतो. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांचा जेव्हा आपल्या त्वचेवर मारा होतो. त्यावेळी आपल्याला सनबर्न त्याचप्रमाणे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो. अशावेळी बाहेर पडताना सनस्क्रिन लावल्याने तुमच्या त्वचेला फायदा होतो.

अकाली वृद्धत्व कमी होते

Sunscreen Types And Benefits In Marathi
Sunscreen Types And Benefits In Marathi

जेव्हा तुम्ही सनस्क्रीन न लावता सूर्याच्या संपर्कात जाता, त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व, सुरकुत्या, बारीक रेषा त्याचप्रमाणे अनेक डाग देखील येऊ शकता. परंतु तुम्ही जर रोज सनस्क्रीन लावले तर या सगळ्यापासून तुम्हाला सुटका मिळेल आणि तुम्ही तुमची त्वचा निरोगी ठेवू शकता.

हेही वाचा – Hydrating Fruits And Vegetables | उन्हाळ्यात डिहायड्रेशनवर ‘ही’ फळे करतात मात, पाण्याची पातळी राहील नियंत्रित 1

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी गरजेचा

सूर्याच्या किरणांमुळे तुमच्या त्वचेचा रंगद्रव्य खराब होऊ शकते. त्याचप्रमाणे अनेकवेळा तुमच्या त्वचेवर काळे डाग पडतात. परंतु जर तुम्ही रोज सनस्क्रीन वापरले तर तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो. त्यामुळे नेहमीच तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन सनसस्क्रीन निवडा.

त्वचेचा कर्करोगापासून सुटका | Sunscreen Types And Benefits In Marathi

सूर्याच्या अतिनील किरणांचा जर आपल्या त्वचेवर सातत्याने मारा होत असेल, तर यामुळे आपल्या त्वचेच्या पेशी खराब होऊ लागतात. आणि आपल्याला त्वचेचा कर्करोग होतो. परंतु तुम्ही जर सनस्क्रिन दररोज वापरत असाल, तर तुम्ही या सूर्याच्या तिने किरणांचा मारा थेट तुमच्या त्वचेवर होणार नाही. आणि यामुळे तुमचे संरक्षण होईल.

पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत

सनस्क्रीन दररोज वापरल्याने तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील किंवा पिंपल्स येऊन गेल्यावर त्याचे डाग राहून गेले असेल, तर सनस्क्रीनचा दररोजच्या वापराने ते डाग देखील हळूहळू कमी होतात आणि तुम्हाला एक नितळ त्वचा देखील मिळते.

हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1

सनस्क्रीन वापरण्याचा योग्य मार्ग

Sunscreen Types And Benefits In Marathi
Sunscreen Types And Benefits In Marathi

सनस्क्रीन हे दररोज दिवसातून एकदा तरी वापरले पाहिजे. तुम्ही घराच्या बाहेर जाण्यापूर्वी दहा मिनिटे आधी हे सनक्रिन तुमच्या चेहऱ्याला लावा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर चांगला परिणाम पाहिजे असेल, तर तुम्ही दिवसातून दोनदा देखील सनस्क्रीन लावू शकता. किंवा तुम्ही जर सातत्याने उन्हातच काम करत असाल, तर दोन तासांनी सनस्क्रीन लावले, तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल सनस्क्रीन लावताना डोळ्याच्या खाली सनस्क्रीन लावायला विसरू नये.

सनस्क्रीनचे प्रकार | Sunscreen Types And Benefits In Marathi

केमिकल सनस्क्रीन

केमिकल सनस्क्रीन हे सूर्याचीपासून येणारी अतिकिरणे हे शोषून घेतात आणि त्यांचे उष्णतेमध्ये रूपांतर करतात. या सनस्क्रिनमध्ये बेंझोन ऑक्सिजन यांसारखे घटक असतात. हे सन स्क्रीन लावायला अत्यंत सोपे असते. ते त्वचेमध्ये पूर्णपणे शोषले जाते. परंतु ज्यांची त्वचा संवेदनशील आहे. त्यांनी या प्रकारचे सनस्क्रीन टाळावे.

फिजिकल सनस्क्रीन

फिजिकल सनस्क्रीनला मिनरल सनक्रिन असे देखील म्हणतात. या सन स्क्रीनमध्ये टॅनियम, डायऑक्साइड आणि झिंक ऑक्साईड यांसारखे घटक असतात. हे सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्यावर एक लेयर तयार करते. ज्यामुळे सूर्यापासून येणारी अतिनील किरणे हे परावर्तित होतात. ज्या लोकांची स्कीन ही सेंसिटिव्ह आहे त्या लोकांसाठी फिजिकल सनस्क्रीन हे अत्यंत फायदेशीर आहे. कारण यामुळे कोणतेही इरिटेशन होत नाही.

हेही वाचा – Hydrating Fruits And Vegetables | उन्हाळ्यात डिहायड्रेशनवर ‘ही’ फळे करतात मात, पाण्याची पातळी राहील नियंत्रित 1

टिंटेड सनस्क्रीन

Sunscreen Types And Benefits In Marathi
Sunscreen Types And Benefits In Marathi

टिंटेड सनस्क्रीन हे केवळ सूर्याच्या आतील किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करत नाही, तर तुमच्या त्वचेचा पोत देखील सुधारते. सर्व त्वचेच्या टोनसाठी हे सनस्क्रीन उपलब्ध आहे. याचे कव्हरेज देखील खूप चांगले आहे. यापासून तुमच्या त्वचेचे सूर्यापासून रक्षण होते. त्याचप्रमाणे तुमची त्वचा देखील चांगली होते. ज्या लोकांची त्वचा ऑयली आहे. त्यांच्यासाठी हेच खूप चांगले आहे.

स्प्रे सनस्क्रीन

हे सनस्क्रीन वापरायला अत्यंत सहज आणि सोपे आहे. त्याचप्रमाणे कुठेही नेता येऊ शकते. हे सन स्क्रीन लावताना आपल्याला आपले हात खराब लावावे करावे लागत नाही. हा स्प्रे फक्त तुम्ही तुमच्या त्वचेवर लावू शकता मारू शकता त्यामुळे तुम्ही तुम्हाला चांगला फायदा होतो.

Leave a Comment