Skin care tips For Summer in marathi | उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, डीहायड्रेशनची समस्या होईल कायमची गायब 1

Skin care tips For Summer in marathi | उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की, उन्हासोबत आपल्या शरीराच्या तसेच त्वचेच्या बाबतीत अनेक समस्या उद्भवत असतात. कारण उन्हामुळे आपल्या त्वचेला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचत असते. उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन असल्याने सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांचा आपल्या त्वचेवर मारा होतो. आणि त्यामुळे आपल्या त्वचेचे मोठे नुकसान होते. आपण नेहमीच आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. परंतु उन्हाळ्यामध्ये त्वचेकडे खास लक्ष देऊन त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या त्वचेचे असे नुकसान होईल.(Skin care tips For Summer in marathi) जे परत कधीही भरून काढता येणार नाही.

Table of Contents

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण उन्हापासून तुमच्या त्वचेला (Skin care tips For Summer in marathi) नक्की काय धोका होतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात तुम्ही कोणत्या चुका करता आणि तुमच्या त्वचेला एकदम ताजेतवाने आणि मॉइश्चराईस ठेवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये काय केले पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आपण माहिती घेणार आहोत. आपल्या त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याचप्रमाणे अशी कोणती काळजी घ्यावी?ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि टवटवीत दिसेल. कारण ऊन वाढले की सनबर्न, रॅशेश, पिंपल्स, टॅनिंग, सनऍलर्जी यांसारख्या गोष्टी उद्भवतात त्यावर आपल्याला काय करावे हे कळत नाही.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल | Skin care tips For Summer in marathi

क्लिंजर आणि सनस्क्रीन वापरणे (Use cleanser And Sunscreen

Skin care tips For Summer in marathi

उन्हाच्या दिवसात उन्हापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून स्वतःच्या त्वचेचे रक्षण करायचे असेल, तर तुमचा चेहरा दिवसातून दोनदा स्वच्छ पाण्याने धुणे खूप गरजेचे आहे. यावेळी चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लिंजरचा वापर करावा. चेहऱ्यावर असलेले अतिरिक्त ऑइल आणि पोर्स स्वच्छ करण्यासाठी हे मदत करतात.

हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराच्या बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करणे खूप महत्वाचे आहे. सनस्क्रीन हे सूर्याच्या अतिरिक्त किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते. तुम्हाला तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार सनस्क्रीन निवडणे गरजेचे असते. तुमचा चेहरा जर जास्त तेलकट असेल तर तुम्ही वॉटर बेस, जेल बेस सनस्क्रीन निवडले नाही तर तुमचा चेहरा आणखी चिकट होऊन त्याला पिंपल्स येतील. या सनस्क्रीनची क्षमता ही 30 SPF असणे गरजेचे आहे. तुम्ही घरातून बाहेर पडण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिट आधी हे सनस्क्रीन चेहऱ्याला लावा. तुम्हाला जर वारंवार घाम येत असेल, तर तुम्ही काही तासांनी चेहरा धुऊन पुन्हा सनस्क्रीन लावले, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.

त्वचा हाइट्रेट ठेवणे | Keep Your Skin Hydrate

उन्हाळ्यात होणारा सगळ्यात जास्त डीहायड्रेशन प्रॉब्लेममुळे होतो. उन्हाळ्यात उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे आपल्याला अनेक समस्या उद्भवतात. यातीलच एक समस्या म्हणजे आपल्याला त्वचेच्या संबंधित अनेक प्रॉब्लेम येतात. उन्हाळ्यात तुमच्या शरीरातून घाम येत असल्यामुळे शरीरातील पाणी आणि इतर पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे शरीरात पाणी त्वचेत ओलावा टिकून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे खूप गरजेचे आहे.

हेही वाचा – Heart Attack Symptoms And Reasons | ‘ही’ लक्षणे दिसत असतील त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क, दिसू शकतो हृदयविकाराचा धोका 0

त्यामुळे दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी पिणे खूप गरजेचे असते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग त्याचप्रमाणे पिंपल्स देखील दूर होतात आणि तुमची त्वचा नेहमीच हायड्रेट राहते.

नाईट रिपेअर फॉर्मुला | Night Repair Formulla

Skin care tips For Summer in marathi
Skin care tips For Summer in marathi

रात्रीच्या वेळी आपण झोपतो, त्यावेळी आपल्या शरीर हे स्वतःला रिपेअर करण्याचं काम करते. त्याचवेळी आपली त्वचा देखील रिपेअर होत असते. यासाठी एक योग्य अशी नाईट क्रीम निवडावी. जी तुमची त्वचा रिकव्हर व्हायला मदत करेल. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील आणि तुमच्या चेहऱ्याला ग्लो देखील येईल.

हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1

बाहेर पडताना छत्रीचा वापर करणे | Skin care tips For Summer in marathi

Skin care tips For Summer in marathi

उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात बसत असल्यामुळे घराच्या बाहेर पडताना स्वतःचे संरक्षण करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही कुठेही चक्कर येऊन पडू शकता. ज्यामुळे तुमचे नुकसान होईल. म्हणूनच ऊन जास्त वाढल्यावर घरातून जाताना छत्री घेऊन जावी.

बाहेर जाताना तोंड बांधावे

सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी आपण जेव्हा घराच्या बाहेर जाऊ. त्यावेळी आपला चेहरा स्कार्फने बांधणे खूप गरजेचे आहे. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा आपल्या चेहऱ्यावर होत नाही. आणि आपले जास्त नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे आपले डोळे आणि डोळ्याच्या आजूबाजूची स्किन देखील खूप नाजूक असते. सूर्याच्या किरणांपासून डोळ्याला देखील हानी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर पडताना सनग्लासेस देखील वापरावे.

हेही वाचा – Heart Attack Symptoms And Reasons | ‘ही’ लक्षणे दिसत असतील त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क, दिसू शकतो हृदयविकाराचा धोका 0

पाणीयुक्त फळांचे किंवा ज्यूसचे सेवन करावे (Drinks fruits And Juice

Skin care tips For Summer in marathi
Skin care tips For Summer in marathi

आपण घरातून बाहेर पडताना नेहमीच पाण्याची बाटली सोबत ठेवावी. जेणेकरून आपल्याला कधीही तहान लागली, तर आपल्याला ते पाणी पिता येईल. त्याचप्रमाणे बाहेर गेल्यावर तुम्ही पाणी युक्त पदार्थांचे सेवन करणे किंवा उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस मिळतात. ते ज्यूस जर तुम्ही पिले तर तुमची त्वचा देखील चांगली राहील आणि तुमच्या शरीराला फायदा होईल.

मॉइश्चरायजरचा वापर करणे | Use Moisturizer

उन्हाळ्यामध्ये तुमची त्वचा खूप जास्त प्रमाणात कोरडी पडते. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी दिवसा आणि रात्री मॉइश्चरायझरचा वापर करणे खूप गरजेचा आहे. कारण हे मॉइश्चरायजर तुमच्या त्वचेतील पाणी लॉक करते. त्यामुळे तुमची त्वचा सॉफ्ट राहते. तुमची त्वचा जर तेलकट असेल, तरी देखील तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात का होईना पण मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. या मॉइश्चरायझरमध्ये हायलूरोनिक ऍसिड आणि नायासिनोमाईड यांसारखे घटक असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुमच्या त्वचेला फायदा होतो.

हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1

गुलाब पाण्याचा वापर करणे | Skin care tips For Summer in marathi

Skin care tips For Summer in marathi
Skin care tips For Summer in marathi

गुलाब पाणी हे तुमच्या चेहऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्याला ग्लो येतो आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त धूळ देखील निघून जाते. त्याचप्रमाणे गुलाब पाण्यामुळे तुमची त्वचा सॉफ्ट राहते आणि तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर गुलाब पाणी वापरणे त्याचप्रमाणे रात्री झोपताना चेहऱ्यावर गुलाब पाणी लावून झोपणे खूप गरजेचे आहे.

Disclaimer – हा लेख केवळ सामान्य माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे यातून दावा ‘आरोग्य कल्याण’ करत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा.

Leave a Comment