Skin Care In Winter | हिवाळा चालू झाला की, हिवाळ्यासोबत अनेक आजार देखील येत असतात. अनेक लोकांना हिवाळा हा ऋतू आवडतो. परंतु हिवाळ्यामध्ये अनेक लोक आजारी पडण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्याचप्रमाणे हिवाळ्यात त्वचा देखील खूप खराब होते.
हिवाळ्यामध्ये त्वचा संपूर्ण कोरडी पडते. तसेच अनेक वेळा त्वचेचे पापुद्रे निघतात. पिंपल्स येण्याची शक्यता देखील असते. अशावेळी हिवाळ्यात तुमच्या त्वचेची जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता आपण हिवाळ्यात कशाप्रकारे त्वचेची काळजी (Skin Care In Winter) घेतली पाहिजे? हे जाणून घेणार आहोत.
हिवाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्यावी? |Skin Care In Winter
क्लिंझर वापरा
हिवाळ्यामध्ये शक्यतो त्वचा अत्यंत कोरडे पडते. अशावेळी तुमच्या त्वचेमध्ये ओलावा टिकून ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे क्लिंझर वापरणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये जास्त मॉइश्चरायझर असलेले क्लिंझर निवडा. जेणेकरून तुमची त्वचा नीट राहील.
मॉइश्चरायझर वापर
हिवाळ्यामध्ये त्वचा जास्त कोरडी पडते. अशा वेळी आपण सातत्याने मॉइश्चरायझर लावणे खूप गरजेचे असते. त्यामुळे सकाळी फेशवॉश केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमच्या त्वचेमध्ये ओलावा टिकून राहील. आणि तुम्हाला जास्त ड्रायनेस जाणवणार नाही.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
सनस्क्रीन वापरणे | Skin Care In Winter
स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन वापरणे खूप गरजेचे आहे. त्यात हिवाळ्यात देखील सनस्क्रीन वापरायला हवे. हिवाळ्यामध्ये जास्त ऊन नसते. परंतु तरीदेखील घराच्या बाहेर जाताना त्वचेला सनस्क्रीन वापरणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमच्या त्वचेचे er) नक्कीच संरक्षण होईल.
भरपूर पाणी पिणे
हिवाळ्यामध्ये शक्यतो जास्त तहान लागत नाही. परंतु तुम्ही तरी देखील आठवणीने पाणी पिणे गरजेचे असते. हिवाळ्यात बॉडीमध्ये थंडावा निर्माण झालेला असतो. त्यामुळे आपल्याला जास्त तहान लागत नाही परंतु आपल्या बॉडीला पाण्याची गरज असते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या.
ज्यूस प्या | Skin Care In Winter
हिवाळ्यामध्ये शक्यतो भरपूर ज्यूस प्यायचा, जेणेकरून त्वचेमधील पाण्याची पातळी नियंत्रणात राहील. सकाळी आणि रात्री ज्यूस प्यायला जमत नसेल तर तुम्ही दुपारच्या वेळी देखील ज्यूस पिऊ शकता.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
मोहरीच्या तेलाचा वापर
हिवाळ्यामध्ये त्वचा अत्यंत कोरडी पडते. थंड वाऱ्यामुळे त्वचेतील आद्रता कमी होते. आणि चेहरा अत्यंत कोरडा दिसू लागतो. आणि त्वचा कोरडे पडते. अशा वेळी जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर केला तर तुमच्या त्वचेत ओलावा टिकून राहतो.
दुधाची साय
दुधाची साय ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. दुधाच्या साईमध्ये आद्रतेचे प्रमाण देखील जास्त असते. हिवाळ्यात चेहरा अत्यंत कोरडा पडल्यानंतर तुम्ही रोज दहा मिनिटे दुधाची साय चेहऱ्यावर लावा. आणि त्यानंतर दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. यामुळे तुमच्या त्वचेतील मॉइश्चराइज टिकून राहते.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
बेसन पीठ
तुमच्या चेहऱ्यावरील ओलावा हिवाळ्यात टिकून ठेवण्यासाठी तुम्ही बेसन पिठाचा देखील वापर करू शकता. यासाठी तुम्ही एक चमचा बेसन पीठ मूठभर हळद दूध एकत्र मिक्स करा. आणि दहा ते पंधरा मिनिटे तुमच्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर तुमचा चेहरा अत्यंत मुलायम होईल.
नारळाचे तेल
नारळाच्या तेलामध्ये अनेक जीवनसत्व असतात. तुम्ही जर कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर नारळाचे तेल लावले, तर तुम्हाला त्यातून लवकर फायदा मिळेल आणि तुमची त्वचा मुलायम होईल.
हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1
कोरफड जेल | Skin Care In Winter
कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. कोरफडीने केवळ तुमच्या त्वचेलाच नाही, तर संपूर्ण शरीराला देखील फायदा होतो. यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे तुमची त्वचा मऊ होते अशावेळी तुम्ही कोरफड जेल लावू शकता.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
लवकर आंघोळ करा
हिवाळ्यामध्ये लोक जास्त गरम पाण्याने खूप वेळा आंघोळ करतात परंतु जास्त वेळ आंघोळ करण्याऐवजी पाच ते दहा मिनिटात तुमची आंघोळ पूर्ण करा.
स्क्रब करू नका | हिवाळ्यात अशाप्रकारे घ्या कोरड्या त्वचेची काळजी; या टिप्स करा फॉलो
हिवाळ्यामध्ये तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचा ब्रश किंवा स्क्रब वापरू नका. अशामुळे तुमची त्वचा आणखी खराब होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात त्वचा (Skin Care In Winter) आधीच कोरडी पडलेली असते. अशावेळी तुम्ही स्क्रब किंवा ब्रशचा वापर केला तर त्यातून रक्त येण्याची शक्यता असते.
Disclaimer – हा लेख केवळ सामान्य माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे ‘आरोग्य कल्याण’ यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा.