Hydrating Fruits And Vegetables | उन्हाळा सुरू झाला की, उन्हासोबत अनेक आजार देखील येतात. या आजारामुळे माणसाला खूप जास्त त्रास होतो. यामध्ये डीहायड्रेशनचा त्रास अनेक लोकांना होत असतो. डीहायड्रेशन झाले की, आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे जुलाब, उलट्या, चक्कर येणे, मळमळ होणे यांसारख्या गोष्टी सुरू होतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पिणे किंवा पाणीयुक्त फळे खाणे खूप गरजेचे असते. त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते. (Hydrating Fruits And Vegetables) तसेच आपल्या शरीराला जास्त धोका निर्माण होत नाही. आता हे डीहायड्रेशन नक्की काय असते? ते कशामुळे होते? आणि डीहायड्रेशन होऊ नये म्हणून काय उपाय केले पाहिजे? याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
डिहायड्रेशन म्हणजे काय? | Hydrating Fruits And Vegetables
आपल्या शरीरात जवळपास 50% पाणी आहे. म्हणजेच आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि त्यामुळे आपल्याला अनेक आजार होतात. त्याला डीहायड्रेशन असे म्हणतात. उन्हाळ्यात येणारा सतत घाम किंवा लघवीद्वारे आपल्या शरीरातील जास्तीत जास्त पाणी बाहेर सोडले जाते. म्हणूनच आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ती पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी उन्हाळ्यात गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे किंवा रसयुक्त फळे आणि पदार्थ खाणे खूप गरजेचे असते. आता आपण असे काही पदार्थ पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते.
नारळाचे पाणी
नारळाचे पाणी डीहाइड्रेशनवर उत्तमरीत्या काम करते. आपले संपूर्ण शरीर ताजेतवाने राहण्यासाठी, त्याचप्रमाणे ऊर्जा मिळण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेशन मिळण्यासाठी नारळाचे पाणी हे खूप उत्तम आहे. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्व आणि खनिजे असतात. त्याचप्रमाणे नारळामध्ये सोडियम आणि पोटॅशियम यांसारखे घटक असतात. त्यामुळे डीहायड्रेशनची समस्या दूर होते.
ताक पिणे
उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त ताक पिणे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असते. ताकामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखे नैसर्गिक घटक असतात. जे तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकून ठेवतात. त्याचप्रमाणे शरीरातील पाण्याची पातळी देखील भरून काढतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात दोन ते तीन वेळा ताक पिणे खूप गरजेचे असते.
लिंबू पाणी
उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी लिंबू पाणी हे एक सगळ्यात उपयुक्त माध्यम आहे. लिंबू पाण्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा देखील मिळते. त्याचप्रमाणे तुम्ही फ्रेश राहता आणि शरीर देखील हायड्रेट राहते. लिंबामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम यांसारखे घटक असतात. त्यामुळे तुमच्या शरीर पूर्ण वेळ हायड्रेट राहते.
संत्री | Hydrating Fruits And Vegetables
एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, संत्र्यामध्ये 88% पाणी असते. त्याचप्रमाणे यामध्ये फायबर, पोटॅशियम, विटामिन सी आणि इतर रोगांची लढण्यासाठी अँटीबोडीज असतात. त्यामुळे उन्हाळ्यात संत्री खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
आंबा
आंबा हे उन्हाळी फळ आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी आंबे येतात. त्याचप्रमाणे आंब्यांमध्ये 83% पाणी असते. तसेच पोटॅशियम, विटामिन ए, विटामिन सी यांसारख्या गोष्टी देखील आंब्यामध्ये असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आंबा खाणे देखील तुमच्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे.
काकडी
काकडी ही पाण्याने समृद्ध असलेली वनस्पती आहे. यामध्ये 95 टक्के पाणी असते. त्याचप्रमाणे विटामिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी पोषण तत्वे देखील असतात. त्यामुळे काकडीचे जर तुम्ही उन्हाळ्यात नेमाने सेवन केले, तर तुम्हाला डीहायड्रेशनची समस्या जाणवणार नाही आणि तुम्हाला इतर कोणतेही आजार देखील होणार नाही.
कलिंगड
कलिंगड हे एक पाणीयुक्त फळ आहे. उन्हाळ्यामध्ये सर्वत्र हे उपलब्ध असते. अनेकजण कलिंगडाचे सेवन करतात. तुम्ही जर दुपारच्या वेळी कलिंगडाचे सेवन केले किंवा कलिंगडाचा ज्यूस बनवून फ्रिजमध्ये ठेवला आणि तो दिवसातून दोन-तीन वेळा पिला तरी तुमच्या शरीराला खूप चांगले हायट्रेशन मिळेल.
उसाचा रस
उन्हाळ्यामध्ये जागोजागी आपल्याला उसाचे गुऱ्हाळे लागताना दिसतात. कारण या दिवसांमध्ये उसाच्या रसाची खूप आवश्यकता असते. तुम्ही जर सातत्याने उन्हात फिरत असाल, तर तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा उसाचा रस पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला ताकद निर्माण होईल आणि तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी देखील नियंत्रणात राहील.
पेर
पेर या फळांमध्ये 88% पाणी असते. त्याचप्रमाणे पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखे घटक देखील या फळांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. त्याचप्रमाणे विटामिन ए, बीटा कॅरिटीन आणि फॉस्फरस यांनी समृद्ध असलेले हे फळ आहे. जे उन्हाळ्यात तुम्ही खाल्ल्याने तुमच्या शरीराला त्याचा खूप जास्त फायदा होतो.
डाळिंब | Hydrating Fruits And Vegetables
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यात डाळिंब देखील खाऊ शकतात. डाळिंबमध्ये भरपूर पाणी असते. आणि त्यामुळे आपले संपूर्ण शरीर हायड्रेट राहते त्याचप्रमाणे डाळिंबाचा रस देखील तुम्ही पिऊ शकता. आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबत डाळिंबचे अनेक फायदे देखील शरीराला होतात.
द्राक्ष
उन्हाळा हा द्राक्षांचा सीजन आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांना देखील द्राक्ष खूप आवडतात. द्राक्षांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी द्राक्ष खूप महत्त्वाची असतात. उन्हाळ्यात तुम्ही द्राक्ष खाऊ शकता त्याचप्रमाणे बाहेर कुठे जाणार असाल, तरी तुमच्या बॅगमध्ये हे घेऊन जाऊ शकता.
अननस
लहान मुलांना तसेच सगळ्यांनाच अननस खूप आवडते. अननसामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. त्यामुळे अननस उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याने आपल्या शरीरातील कमतरता पाण्याची कमतरता भरून निघते. त्यामुळे तुम्ही ऑफिसला जाताना किंवा मुलांना शाळेत जाताना टिफिनमध्ये अननस देऊ शकता.