HMPV Virus In Marathi | 2020 मध्ये चीनमध्ये कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली. आणि या व्हायरसने केवळ चीनलाच नव्हे व संपूर्ण जगाला हैराण केले होते. या वायरसची लागण झाल्यानंतर अनेक लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे. जगभरात जवळपास 70 लाखांपेक्षा अधिक लोकांचा बळी या विषाणूमुळे केलेला आहे. या व्हायरसवर लस आल्यानंतरच यावर नियंत्रण मिळवता आले. त्यानंतर चीनच्या आरोग्य संस्थेवर सगळ्यांचेच लक्ष असते.
आता पुन्हा एकदा चीनमधून एक कोरोनासारखाच जीवघेणा विषाणूसमोर आलेला आहे. या विषयाचे नाव ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस HMPV (HMPV Virus In Marathi) असे आहे. कोरोना नंतर 5 वर्षांनी या व्हायरसने पुन्हा एकदा चीनमध्ये चांगलेच थैमान घातलेले आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊनची वेळ येईल अशी परिस्थिती चीन या देशात उत्पन्न झालेली आहे. त्याचप्रमाणे हाती आलेल्या माहितीनुसार भारतात देखील या विषाणूने शिरकाव केलेला आहे.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
बंगळुरूमधील एका आठ महिन्याच्या बाळाला या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे भारत सरकारने आता आरोग्य यंत्रणेबाबत अलर्ट जारी केलेला आहे.या विषाणूची लागण झाल्यावर रुग्णांमध्ये लक्षणे दिसतात. आता हा ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV Virus In Marathi) नक्की काय आहे? याची लक्षणे काय असतात? आणि यामुळे माणसांच्या जीवाला कितपत धोका आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे ह्यूमन मेटान्यू व्हायरस (HMPV) ? | HMPV Virus In Marathi
हा HMPV व्हायरस गेल्या दहा वर्षापासून सक्रिय आहे. 2001 मध्येच पहिल्यांदा नेदरलँड मध्ये हा व्हायरस सापडला होता. श्वसनाचा त्रास झालेल्या मुलांच्या सॅम्पलमधून या आजाराची माहिती मिळाली. हा व्हायरस सगळ्या ऋतूमध्ये सक्रिय असतो. ज्या व्यक्तीला या व्हायरस (HMPV Virus In Marathi) संसर्ग झालेला आहे. त्या व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून हा व्हायरस सर्वत्र पसरतो. 1958 मध्ये देखील हाच वायरस मोठ्या प्रमाणात पसरला होता. असे तज्ञांनी देखील सांगितलेले आहे.
ह्युमन मेटान्यूमो वायरसची (HMPV) लक्षणे | HMPV Virus In Marathi
HMPV ची कोरोना सारखी लक्षणे
कोरोना या विषाणूची जी काही लक्षणे होती. तीच लक्षणे सामान्यपणे या विषाणूची दिसतात. खास करून घसा खवखवणे, ताप येणे, अशक्तपणा येणे यांसारखी लक्षणे दिसतात. जर ही लक्षणे तुम्हाला दीर्घकाळ जाणवत असतील, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.
खोकला आणि ताप | HMPV Virus In Marathi
HMPV (HMPV Virus In Marathi)या व्हायरसची लागण झाल्यावर खास करून लोकांना सारखा खोकला येतो. आणि दीर्घकाळ ताप राहतो. भारतामध्ये या विषाणूचा शिरकाव झालेला आहे . त्यामुळे या विषाणूची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला दीर्घकाळ ताप आणि खोकला जाणवत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
श्वास घेण्यास त्रास
श्वास घेण्यास त्रास होणे हा या विषाणूचा (HMPV Virus In Marathi) मुख्य लक्षण आहे. जर तुम्हाला श्वास घेण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला. किंवा योग्य प्रकारे जर श्वास घेता येत नसेल, तर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि आवश्यक त्या चाचण्या करून घ्या.
नाक बंद होणे
सध्या थंडी चालू आहे, थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोकांना सर्दीची समस्या निर्माण होते. आणि नाक पॅक होते. परंतु जर सर्दी नसतानाही तुमचे नाक पॅक होत असेल आणि तुम्हाला श्वास घेता येत नसेल, तर हे देखील या विषाणूचे एक लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचे संपर्क साधा.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
घशात घरघर होणे | HMPV Virus In Marathi
घशामध्ये घरघर होणे हे देखील या विषाणूचे एक मोठे लक्षण आहे. जर तुम्हाला दीर्घकाळ घशामध्ये त्रास होत असेल, तर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.
हा विषाणू कसा पसरतो?
या विषाणूचा प्रसार हा कोरोनासारखाच वेगाने होत आहे. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून तसेच शिंकेतून हा विषाणू सर्वत्र पसरत आहे. तसेच जर हा विषाणू असलेल्या पृष्ठभागाला तुम्ही स्पर्श केला, तरी देखील तुम्हाला या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. या विषाणूची जर तुम्हाला अगदी थोड्या प्रमाणात लागण झाली असेल, तर दोन ते पाच दिवसांमध्ये तुम्ही या आजारातून बरे देखील होऊ शकता.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
HMPV विषाणूचा सर्वाधिक धोका कोणाला ? | HMPV Virus In Marathi
या विषाणूचा (HMPV Virus In Marathi)धोका जास्त करून वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना आहे. दमा, क्रॉनिक, पलमनोरी डिसीज, फुफुसाचा आजार असणाऱ्या व्यक्तींना देखील या विषाणूचा धोका सर्वाधिक आहे. या आजाराने एकदा संक्रमित झाल्यास त्या व्यक्तीची परिस्थिती देखील गंभीर होऊ शकते. त्याचप्रमाणे केमोथेरपीचे पेशंट, अंग प्रत्यारोपण केलेल्या नागरिकांना देखील या आजाराचा सर्वाधिक धोका आहे, असे सांगितले जात आहे.
हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1
HMPV या व्हायरस पासून बचाव कसा करायचा?
HMPV या व्हायरस (HMPV Virus In Marathi) पासून बचाव करण्यासाठी आपण कोरोना काळात जी काळजी घेतली होती, तशीच काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही साबणाने आणि पाण्याने हात नियमितपणे स्वच्छ धुवायचे आहे. हातावर साबण किंवा हँडवॉश घेतल्यानंतर कमीत कमी 20 सेकंद त्याने हा धुवायचे आहेत. तुम्ही जर कोणत्याही वस्तूला हात लावला, तर त्या हातांनी चेहऱ्याला स्पर्श करायचा नाही.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून पुरेसे अंतर राखायचे आहे. यासोबत दरवाजांचे हँडल, लहान मुलांची खेळणी, दरवाजे खिडक्या नियमितपणे स्वच्छ करा. घरात जास्तीत जास्त सॅनिटायझरचा वापर करा. बाहेरून कुठूनही आल्यानंतर आधी हात पाय स्वच्छ धुऊन नंतरच इतर वस्तूंना हात लावा. शक्य झाल्यास बाहेर जाताना मास्क तसेच स्कार्फ बांधा.
Disclaimer – हा लेख केवळ सामान्य माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे ‘आरोग्य कल्याण’ यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा.