High Protien Foods | आज-काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे प्रत्येकजण करिअरच्या पाठी लागलेले आहेत. परंतु या सगळ्यांमध्ये लोक त्यांच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात. सगळ्यांना एक लक्झरीअस आयुष्य जगायचं आहे. प्रत्येकाचे हे स्वप्न असतं. परंतु एक लक्झरीस लाईफ मिळवण्याच्या नादात आपण आपल्या शरीराकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करतो. स्वतःला कामांमध्ये इतके झोकून देतो की, आपल्याला खाण्याचेही (High Protien Foods) लक्ष राहत नाही. जेवण बनवायला आणि खायला वेळ नसल्यामुळे लोक अगदी फास्ट झालेले आहेत. आणि त्याचमुळे लोक फास्ट फूड खातात आणि याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. या फास्टफूडच्या जगात लठ्ठपणा वाढणे, कमजोरी येणे यांसारख्या अनेक समस्या वाढत चाललेले आहेत.
निरोगी शरीरासाठी आपल्या शरीराला सगळी पोषकतत्व मिळणे खूप गरजेचे असते. पौष्टिक आणि ताजे अन्न खाणे गरजेचे असते. उत्तम आरोग्यासाठी आपल्याला प्रोटीनयुक्त (High Protien Foods) पदार्थ खाणे खूप गरजेचे असते. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला इतर पोषक तत्त्वावर गरजेचे असतात. त्याचप्रमाणे प्रोटीन देखील खूप गरजेचे असतात. या प्रोटीनचा (High Protien Foods) उपयोग आपल्या शरीरामध्ये अमिनो ऍक्सिड तयार करण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे प्रोटीन्सच्या चांगल्या कंटेंटमुळे शरीराची आणि स्नायूंची योग्य वाढ होते. लाल रक्त पेशींचे उत्पादन वाढते. तसेच क्षेत्रातील रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते.
आहार तज्ञांच्या मते एका पुरुषाने दिवसभर 56 ग्रॅम प्रोटीन (High Protien Foods) घेणे गरजेचे आहे. तर महिलेने 46 ग्रॅम प्रोटीन घेणे गरजेचे असते. आपल्या शरीराला एवढ्या प्रोटीनची गरज असते. त्यामुळे ते प्रोटीन देणे गरजेचे असते. अनेकवेळा आपल्याकडे असा गैरसमज झालेला आहे की, प्रोटीन हे आपल्याला केवळ नॉनव्हेज पदार्थांमधून किंवा अंड्यात मधूनही मिळते. परंतु हा गैरसमज आहे अनेक व्हेज असे पदार्थ आहेत, ज्याच्या सेवनाने आपल्या शरीरातील प्रोटीनची पातळी भरून निघते. आज आपण आता असे काही पदार्थ जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील प्रोटीनची पातळी नियंत्रित राहते.
पालक | High Protien Food
आज-काल अनेक लोकांना हिरव्या भाज्या खायला आवडत नाहीत. परंतु हिरव्या भाज्यांमध्ये जास्त पौष्टिक घटक असतात. त्यात पालकांमध्ये तर अधिक घटक असतात. यामध्ये आयन त्याचप्रमाणे प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. 10 ग्रॅम पालकांमध्ये जवळपास 3 ग्रॅम प्रोटीन असते.
ब्रोकोली | High Protien Foods
ब्रोकोलीमध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असते. परंतु त्यामध्ये प्रोटीन देखील प्रमाणात असते. ब्रोकोलीमध्ये असणारे फायबर हे आपल्या शरीरातील स्नायू तयार करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे ब्रोकोलीचा आपल्या आहारात समावेश असणे गरजेचे आहे.
हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1
मशरूम |Mushroom
मशरूममध्ये प्रोटीनचे प्रमाण देखील जास्त असते. 10 ग्रॅम मशरूम मध्ये जवळपास 4 ग्रॅम एवढे प्रोटीन असते. त्याचप्रमाणे यामध्ये विटामिन बी 12 देखील असते. त्यामुळे मशरूमचा आठवड्यातून एकदा तरी आपल्या आहारात समावेश करावा.
कडधान्य
कडधान्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. त्यातही चण्यामध्ये खूप जास्त प्रोटीन असते. 100 ग्रॅम पांढऱ्या चण्यांमध्ये 19 ग्राम एवढे प्रोटीन असते. तसेच फायबरही असते.
दोडका | High Protien Foods
अनेक लोकांना दोडक्याची भाजी अजिबात आवडत नाही. परंतु दोडक्यामध्ये अनेक गुणकारी गुणधर्म असतात. यामध्ये बीटा कॅरिटीन, विटामिन ए, आयन, प्रोटीन आणि कार्ब असतात. त्याचप्रमाणे दोडक्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे आरोग्याला याचा फायदा होतो.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
डेरी उत्पादन
दही, दूध आणि पनीरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहे. तुमच्या शरीरातील प्रोटीनची पातळी भरून काढण्यासाठी तुम्ही दुधाचे पदार्थ तुमच्या जेवणामध्ये समावेश करू शकता.
डाळी
डाळी हा आपल्या शरीरासाठी प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहे. हिरव्या आणि पिवळ्या डाळीमधून शरीराला 9 ते 10 ग्रॅम एवढे प्रोटीन मिळते. त्याचप्रमाणे मूग, चण्याची डाळ यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
भाज्या
भाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते, पालक, बटाटा, ब्रोकोली, हिरवा वाटाणा, रताळे या पदार्थांमध्ये खूप जास्त प्रोटीन असते. त्यामुळे या भाज्यांचा समावेश आपल्या आहारात करणे गरजेचे असते.
ड्राय फ्रुट्स | High Protien Foods
ड्रायफ्रूट्स हे आपल्यासाठी एक वरदानच आहे. अनेक आजारांवर ड्रायफ्रूट्सने इलाज होतो. काजू, बदाम, बेदाणे, खजूर यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते. वीस ते 26 बदामांमधून जवळपास 6 ग्रॅम एवढे प्रोटीन मिळते. त्याचप्रमाणे विटामिन ई आणि फायबर देखील आपल्याला प्रोटीन ड्रायफ्रूट्स मिळवून मिळते. त्यामुळे दिवसाला ड्रायफ्रूट्स खाणे गरजेचे असते.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
चीया सिड्स
चिया सिड्स सुपरफुड असेही म्हटले जाते. यामधून अनेक पोषकतत्वे आपल्या शरीराला मिळतात. तुम्ही जर याचे योग्य प्रमाणात सेवन केले, तर तुमच्या शरीराला खूप जास्त प्रोटीन मिळेल. यासाठी तुम्ही रात्री चीया सिडसला पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन करावे तुम्हाला त्याची चांगला फायदा मिळेल.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
पनीर
पनीरमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन आढळते . अर्धा कप पनीर मध्ये साधारण 12 g एवढे प्रोटीन असते. त्यामुळे आहारात पनीरचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. शाकाहारी व्यक्तींना पनीर प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान एक-दोन वेळा तरी पनीरचे सेवन करावे.
ओट्स
ओट्सला सुपर फूड देखील म्हटले जाते. यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते. त्याचप्रमाणे फायबर देखील असते. तुम्ही जर ओट्सचे सेवन केले, तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. आणि हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो. त्यामुळे ओट्सचा आहारात समावेश करणे खूप गरजेचे आहे.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
राजगिरा
भारतात उपवासासाठी राजगिऱ्याचे सेवन केले जाते. राजगिऱ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे तुम्ही राजगिराचा तुमच्या जेवनामध्ये समावेश केला पाहिजे यातून तुम्हाला खूप जास्त प्रोटीन मिळेल.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
सोयाबीन | High Protien Foods
शाकाहारी व्यक्तींसाठी सोयाबीन हा प्रोटीनचा एक मोठा खजिना आहे आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे प्रोटीन या सोयाबीनमधून मिळतात. त्याचप्रमाणे सोयाबीनमध्ये इतर अनेक पोषकतत्वे असतात. त्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. म्हणून आहारात सोयाबीनचा वापर करणे गरजेचे आहे.
Disclaimer – हा लेख केवळ सामान्य माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे ‘आरोग्य कल्याण’ यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा.