Colour Blindness In Marathi | आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु त्यातील डोळे हा अवयव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. कारण आपण या डोळ्यांमुळे संपूर्ण जग पाहू शकतो. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो. त्यामुळे डोळे निरोगी असणे खूप गरजेचे असते. अनेक वेळा सरकारी विभागामध्ये नोकर भरती असते. त्यावेळी उमेदवारांची दृष्टी तसेच डोळे चेक केले जातात.
म्हणजेच उमेदवारांचे कलर व्हिजन तपासण्यासाठी ही टेस्ट केली जाते. कारण वेगवेगळ्या कामासाठी रंगाचा संबंध अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे रंगातील फरक ओळखण्यासाठी तो व्यक्ती कितपत सक्षम आहे. हे पाहण्यासाठी ही टेस्ट केली जाते. आता तुम्ही म्हणाल की, ही टेस्ट करणे खरंच गरजेचं आहे क? तर हो आहे. कारण अनेक लोकांना रंगांधळेपणाचा (Colour Blindness In Marathi) त्रास असतो.
यालाच कलर ब्लाइंडनेस (Colour Blindness In Marathi) असे म्हणतात. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला सामान्य प्रकाशात देखील रंग ओळखता येत नसेल, किंवा रंग ओळखण्यात समस्या निर्माण होत असेल, तर याला रंगांधळेपणा असे म्हणतात. अशावेळी त्या व्यक्तीची दृष्टी अत्यंत सामान्य असते. परंतु केवळ रंग ओळखण्यामध्ये त्याला समस्या निर्माण होतात. आता हा रंगांधळेपणा (Colour Blindness In Marathi) म्हणजे नक्की काय? आणि याला कोणती कारणे आहेत?आणि यावर काय उपचार आहेत? हे आपण जाणून घेऊया.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
रंगांधळेपणा म्हणजे काय ? | Colour Blindness In Marathi
1798 मध्ये सगळ्यात आधी इंग्लिश केमिस्ट जॉन डाल्टन यांनी रंगांधळेपणावर एक प्रबंध सादर केला आणि या नवीन आजाराची जगाला ओळख करून दिली. जॉन डाल्टन हे स्वतः या आजाराने ग्रस्त होते. आपल्या डोळ्याच्या आतील बाजूस रेटीना म्हणजेच दृष्टीपटल असते. दृष्टी पटलावर रॉड आणि कोन हा दोन विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात. रोड पेशी 120 दशलक्ष एवढ्या संख्येने असतात. तर को पेशी या सहा ते सात दशलक्ष पेशी असतात. या पेशी मॅक्युला नावाच्या एका अति संवेदनशील भागात एकवटलेल्या असतात.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे त्यातील 0.3 आकारात च्या मॅक्युलाच्या केंद्रबिंदूत जास्त प्रमाणात असतात. हा नजरेतील तीक्ष्णता आणि वेगवेगळे रंग ओळख महत्त्वाचे काम करतात. वेगवेगळ्या रंगातील फरक ओळखण्याचे काम यात कोन पेशी करतात. परंतु जर कोणत्याही कारणाने कोन पेशींना इजा झाली किंवा त्या निकामी झाल्या, तर त्या पेशी रंग ओळखण्यास असमर्थ ठरतात. आणि त्यामुळे व्यक्तीला रंगांधळेपणा (Colour Blindness In Marathi) निर्माण होतात.
रंगांधळेपणा येण्याची कारणे | Colour Blindness In Marathi
अनुवंशिकता
आज काल स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये रंग आंधळेपणा येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. याचे कारण म्हणजे अनुवंशिकता, अनुवंशिकतेनुसार देखील हा आजार तुम्हाला होऊ शकतो. या आजाराचे प्रमाण पुरुषांमध्ये 8 टक्के तर स्त्रियांमध्ये 1 टक्का आहे.
मेंदूला इजा झाल्यास
जर तुमच्या मेंदूला इजा झाल्यावर दृष्टीपटल आला किंवा दृष्टी नाडीला काही समस्या निर्माण झाल्या तरी रंगांधळेपणा येण्याची समस्या असते.
औषधांमुळे | Colour Blindness In Marathi
जर कोणताही व्यक्ती मलेरया किंवा सांधेवातावर उपचार घेण्यासाठी काही औषधे घेत असतील, तर त्यामुळे देखील रंगांंधळेपणा निर्माण होण्याची शक्यता असते.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
मद्यपान आणि धूम्रपान करणे
मद्यपान आणि धूम्रपान आता आपल्या शरीरावर खोलवर परिणाम होत असतो. याचा तुमच्या दृष्टीवर देखील परिणाम होतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान करत असाल, तरी तुम्हाला रंगांधळेपणा येण्याची शक्यता असते.
हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1
रंगांधळेपणाचे प्रकार | Colour Blindness In Marathi
मोनोक्रोमॅसी
ज्यावेळी हा सिंड्रोम होतो. तेव्हा दोन किंवा तीन कोन रंगद्रव्य म्हणजे लाल निळा आणि हिरवा हे रंगद्रव्य आपल्या डोळ्यात अनुपस्थितीत असतात किंवा ते खराब होतात. त्यामुळे सहसा आपल्याला लाल निळा आणि हिरवा या तीन रंगांमधील फरक समजत नाही. म्हणजेच या मध्ये रंग आंधळेपणा बाबत आपले दृष्टी काही प्रमाणात कमी होते.
द्वि क्रोमसी
या प्रकारचा सिंड्रोम झाल्यावर कोन रंगद्रव्यांपैकी लाल, निळा किंवा हिरवा यांपैकी एक कोणता तरी रंगद्रव्य खराब होतो. किंवा उपस्थित नसतो यामुळे देखील रंग ओळखण्यास त्रास होतो
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
रंगांधळेपणा रंगांधळेपणाची लक्षणे
डोळ्यांची जलद हालचाल
जर एखाद्या व्यक्तीला रंग आंधळेपणा झाला असेल, तर त्यांच्या डोळ्यांची हालचाल अगदी जलद होते. डोळे फिरवण्याची क्षमता देखील मोठ्या प्रमाणात वाढते.
तेजस्वी प्रकाशाने संवेदनशील
जर कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यावर जास्त प्रमाणात प्रकाश गेला, तर त्या व्यक्तीला तो प्रकाश सहन होत नाही. म्हणजे जास्त प्रकाश याबाबत तो व्यक्ती संवेदनशील होतो.
रंग पाहण्यात अडचण | Colour Blindness In Marathi
अनेक वेळा रंग आंधळेपणा झालेल्या व्यक्तींना रंग पाहण्यामध्ये अडचण निर्माण होते. त्यांना रंगांमधील फरक ओळखण्यात देखील समस्या निर्माण होतात.
रंगांच्या छटांमधील फरक ओळखण्यास समस्या
रंगांधळेपणा झाल्यावर व्यक्ती लाल, हिरवा आणि राया तीन रंगांमधील फरक सहसा समजत नाही. त्याचप्रमाणे इतर रंग ओळखणे देखील त्यांच्यासाठी अवघड होते.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
रंगांधळेपणावर उपचार | Colour Blindness In Marathi
सध्या तरी रंगांधळेपणा या सिंड्रोमवर कोणतेही उपचार नाही. परंतु काही रंग सुधारण्यासाठी फोटोग्राफी फ्रेम किंवा फिल्टर आणि कॉन्टॅक्ट लेन्सचा चष्मा देखील वापरला जाऊ शकतो. रंगांधळेपणा सुधारण्यासाठी योग्य प्रमाणात संतुलित आहार घेणे देखील गरजेचे आहे.
रंगाने झाल्यामुळे अनेक व्यक्तींना दैनंदिन जीवनात देखील अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्यांनी दररोज ताज्या भाज्या, फळे फुले निवडावी आणि त्यांच्यामधील फरक ओळखावा. वेगवेगळ्या फुलांमधील फरक ओळखावा. अशा वेळी लोकांना कार चालवताना तसेच कपडे निवडताना देखील अनेक अडचणी येतात.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला जर रंगांमधील फरक ओळखण्यासाठी अडचणी येत असतील. तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यायची आणि डॉक्टर तुम्हाला रंगांधळेपणा असल्याचे एक सर्टिफिकेट देतात. अशावेळी जर तुम्ही सिग्नल जरी तुटला तरी तुम्हाला ते सर्टिफिकेट दाखवता येते.
Disclaimer – हा लेख केवळ सामान्य माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे ‘आरोग्य कल्याण’ यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा.