PCOD Information In Marathi | PCOD म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपचार 1

PCOD Information In Marathi | आज-काल वाढत्या वयासोबत बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे. स्त्रियांमध्ये देखील अनेक बदल होताना दिसत आहे. स्त्रिया अनेक आजारांना बळी पडत आहे. जसं जसं वय वाढत आहे, तसं शरीराबाबत अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. अनेक वेळा डॉक्टरांकडून चांगले उपचार घेऊन देखील काही समस्या दूर होत नाहीत. अशावेळी स्त्रियांमध्ये मानसिक तणाव येतो (PCOD Information In Marathi) आणि त्यांना आणखी वेगळ्या शारीरिक समस्या उद्भवतात.

महिलांमधील हार्मोनल इम्बॅलन्स ही समस्या आपण अनेकवेळा ऐकली आहे. त्यातही PCOD हा 9PCOD Information In Marathi) शब्द आपण अनेक वेळा ऐकलाच आहे. पण अनेक लोकांना याचा अर्थ देखील माहित नाही. हे PCOD म्हणजे नक्की काय आहे? PCOD कशामुळे होतो? त्याची लक्षणे कोणती असतात? PCOD बरा होतो का? यासाठी काय करावे लागते? ही आणि अशी अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. आणि आज आपण त्यात सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

PCOD म्हणजे काय ? | PCOD Information In Marathi

PCOD Information In Marathi
PCOD Information In Marathi

PCOD हा महिलांच्या शरीरात होणारा एक हार्मोनल प्रॉब्लेम आहे. PCOD मध्ये महिलांच्या गर्भाशयात लहान तसेच मोठ्या आकाराच्या अनेक गाठी तयार होतात. या गाठीमुळे महिलांची मासिक पाळी अनियमित होते. अनेक वेळा महिलांचे वजन वाढते. आणि गर्भधारणेमध्ये देखील अनेक समस्या निर्माण होतात. जर या आजाराचे वेळेवर उपचार केला नाही, तर अनेक महिलांना वंध्यत्व देखील येऊ शकते. परंतु आजकाल विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप प्रगत झालेले आहे. त्यामुळे या सगळ्या आजारांवर अगदी पटकन उपचार करता येतात. सुरुवातीच्या काळात PCOD ची समस्या ही 30 ते 35 या वयोगटातील स्त्रियांना होती. परंतु आता PCOD चा त्रास खूप जास्त वाढलेला आहे. आणि अगदी 18 ते 25 वर्षाच्या वयोगटातील मुलींना देखील PCOD चा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे.

हेही वाचा – Home Remedies Of Control Diabetis In Marathi | मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ घरगुती पद्धतींचा करा अवलंब 1

PCOD ला पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम असे देखील म्हणतात.बया परिस्थितीमध्ये अंडाशयातील परिपक्व अंडी किंवा काही अंशी परिपक्व अंडी खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. आणि नंतर त्या अंड्याचे सिस्ट तयार होते. हे सिष्ट अंडाशयाचा बराच भाग व्यापून टाकतात. आणि या सिष्ट मधून पुरुषी हार्मोनचा स्त्राव होतो. त्यामुळे महिलांची पाळी अनियमित होते. हा त्रास सुरू झाल्यावर महिलांचे जीवनशैली बदलते आणि इतर आजार देखील वाढतात. यामुळे बदलती जीवनशैली, ताण, नैराश्य, लठ्ठपणा या सगळ्या गोष्टीमुळे महिलांना वंध्यत्व येण्याची देखील शक्यता असते. तसेच या आजाराचे वेळेवर उपचार झाले नाही, तर मधुमेह, हृदयविकार देखील येण्याची शक्यता असते.

PCOD ची लक्षणे | PCOD Information In Marathi

PCOD Information In Marathi
PCOD Information In Marathi

अनियमित पाळी

PCOD झाल्यानंतर महिलांना दर महिन्याला वेळच्या वेळी पाळी येत नाही. किंवा नेहमीच्या तारखे पेक्षा खूप उशिरा येते. किंवा दोन दोन महिने येतच नाही. हे PCOD चे मुख्य लक्षण आहे. अनेक वेळा सहा महिन्यातून देखील मासिक पाळी येते जर तुम्हाला देखील अशी लक्षणे आढळत असेल, तर अजिबात उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या .

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

केस गळती होणे

PCOD Information In Marathi

PCOD असणाऱ्या महिलांनी सुरुवातीच्या काळात डोक्यावरील केस गळण्याचे प्रमाण वाढते. केसांची कितीही काळजी घेतली तरी केसांची गळती चालूच राहते. या महिलांमध्ये पुरुष हार्मोनचे प्रमाण वाढते. त्यामुळे लोकांच्या मागच्या भागातले केस पुरुषांप्रमाणे गळू लागतात. यामुळे महिलांना अनेक मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागते.

हेही वाचा – Sunscreen Types And Benefits In Marathi | सनस्क्रीन म्हणजे काय? जाणून घ्या सनस्क्रीन लावण्याचे फायदे आणि प्रकार 1

त्वचेमध्ये बदल

PCOD Information In Marathi
PCOD Information In Marathi

PCOD झाल्यावर महिलांच्या चेहऱ्यावर मानेवर तसेच पाठीवर छोटे छोटे फोड येण्यास सुरुवात होतात. शरीराच्या प्रायव्हेट भागात काळवटपणा वाढतो. त्वचेचा रंग नेहमीच बदलत राहतो. तसेच चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळवटपणा येण्याचे प्रमाण देखील वाढते.

हेही वाचा – Skin care tips For Summer in marathi | उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, डीहायड्रेशनची समस्या होईल कायमची गायब 1

वजनात चढ उतार

PCOD Information In Marathi
PCOD Information In Marathi

PCOD झाल्यानंतर जवळपास 50 ते 60 टक्के महिलांमध्ये लठ्ठपणा दिसून येतो. अनेक महिलांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. तर अनेक वेळा PCOD झाल्यानंतर महिलांचे वजन हे झपाट्याने कमी देखील होते. अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

शरीरावर अतिरिक्त केसांची वाढ

PCOD झाल्यानंतर महिलांच्या शरीरामध्ये पुरुषी हार्मोनचे प्रमाण वाढते. ज्याप्रमाणे त्यांच्या डोक्याच्या केसांची गळती होते. त्याचप्रमाणे महिलांच्या चेहऱ्यावर पाठीवर पोटावर तसेच छातीवर अतिरिक्त केसांची वाढ होते. ज्याप्रमाणे पुरुषांमध्ये केसांची वाढ होते तसेच महिलांना देखील होते.

हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1

प्रजननास अडथळा | PCOD Information In Marathi

PCOD Information In Marathi
PCOD Information In Marathi

PCOD झाल्यानंतर महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही. मासिक पाळी वेळेवर आली, तरी गर्भधारणा होण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. जवळपास 80 ते 90% महिलांना PCOD झाल्यानंतर गर्भधारणा होण्यास अडथळा निर्माण होतो.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

मधुमेह

PCOD Information In Marathi
PCOD Information In Marathi

अनेकवेळा PCOD झालेल्या महिलांना मधुमेह होण्याची शक्यता असते. जर कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला अचानक मधुमेह झाला, तर ते देखील PCOD चे हे कारण असू शकते. त्यामुळे अशावेळी अजिबात उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा – Heart Attack Symptoms And Reasons | ‘ही’ लक्षणे दिसत असतील त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क, दिसू शकतो हृदयविकाराचा धोका 0

PCOD चे निदान कसे होते? | PCOD Information In Marathi

PCOD मध्ये चेहऱ्यावर पाठीवर तसेच पोटावर अतिरिक्त केसांची वाढ होते. हे PCOD चे एक लक्षण आहे असे आढळून आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. त्याचप्रमाणे डॉक्टर त्यांना विचारून PCOD साठी तुम्ही ब्लड टेस्ट देखील करून घेऊ शकतात. त्यातून तुमचे निदान होईल तसेच लक्षणे दिसल्यास डॉक्टर अल्ट्रासाउंड करण्याचा सल्ला देतात. यातून अंडाशयातील सिस्टचा आकार लक्षात येतो. यानंतरच PCOD वर उपचार घेता येतात.

PCOD वर उपाय

PCOD बरा होण्यासाठी कोणत्याही विशिष्ट प्रकारची औषधे बनवलेली नाही. परंतु तुम्ही जर योग्य आहार घेतला तर PCOD वर नियंत्रण आणू शकता. आणि हळूहळू गर्भाशयात असलेल्या पुरुषी हार्मोन तुम्ही कमी करू शकता. आता यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला काही बदल करावे लागतील. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्या लागतील. आता त्या कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

PCOD वर जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात करावे लागेल. यामध्ये तुम्ही धान्य, शेंगा विविध प्रकारच्या बिया, फळे प्रक्रिया न केलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे यामुळे PCOD वर उपचार होतात.त्याचप्रमाणे तुम्ही ओमेगा फॅटी ऍसिड असलेल्या पदार्थांचे सेवन करा. यामधून खास करून माशाचे सेवन करणे गरजेचे आहे.PCOD मध्ये तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डार्क चॉकलेटचे सेवन देखील करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त ऑलिव्ह ऑइल, सुकामेवा, बदाम, पिस्ता यांसारख्या पदार्थांचे सेवन करा.

PCOD झाल्यानंतर तुम्ही सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खाणे खूप गरजेचे आहे. यामध्ये पालक, शेवग्याचा पाला, ब्रोकोली, शेपू मेथी, कोथिंबीर यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. त्याचप्रमाणे काकडी, गाजर, बीट, कोबी, कांदा पदार्थाचे देखील दररोज सेवन करा.जवळपास 50 ते 60 टक्के महिलांचे वजन वाढते. त्यांना लठ्ठपणा येतो. अशावेळी तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही नियमित व्यायाम करा म्हणजे तुमच्या शारीरिक हालचाली देखील योग्य प्रमाणात राहतील. अनेक वेळा PCOD झाल्यानंतर महिला या मानसिक त्रासाला सामोरे जातात. अशावेळी तुम्ही योगा करणे खूप गरजेचे आहे. योगा केल्याने महिलांचे मानसिक आरोग्य चांगले राहते. त्याचप्रमाणे तुम्ही दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे खूप गरजेचे आहे.

हेही वाचा – Home Remedies Of Control Diabetis In Marathi | मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ घरगुती पद्धतींचा करा अवलंब 1

PCOD मध्ये काय करू नये ? | PCOD Information In Marathi

PCOD झाल्यानंतर आपल्या आहारांवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी तुम्ही बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. तसेच जास्त तळलेले पदार्थ देखील खाऊ नका. पिझ्झा बर्गर, ब्रेड यांसारखे मैदा युक्त पदार्थ खाणे देखील तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक असते. तसेच साखरेचे कमीत कमी सेवन करा. तुम्हाला जर जास्त गोड खाण्याची इच्छा झाली, तर अशावेळी तुम्ही फळे खाऊ शकता. फळांमधील नैसर्गिक साखर ही तुमच्या शरीरासाठी फायद्याचे असते.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच जास्तीत जास्त कोल्ड्रिंक्स पिणे देखील चांगले नाही. झाल्यानंतर तुम्ही अल्कोहोल धूम्रपान यांचे सेवन करू नये. तसेच कॉफीचे सेवन देखील करू नये. एका जागेवर जर तुम्ही जास्त वेळ बसून राहिला, तरी देखील या PCOD चा त्रास जास्त वाढू शकतो. त्यामुळे आपल्या शरीराला नेहमी कार्यरत ठेवावे. तुम्ही जर सगळ्या गोष्टींचे वेळेवर पालन केले. डॉक्टरांचा सल्ला घेतला तर तुम्ही या PCOD वर विजय मिळवू शकता. PCOD झाल्यानंतर महिला अनेकदा डिप्रेशनमध्ये जातात.

परंतु या जगात अशी कोणतीही समस्या नाही, त्याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे तुम्ही हिमतीने या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी PCOD ची लक्षणे कोणती आहेत? हे समजून घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला अशी कोणतीही लक्षणे दिसली, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संवाद साधला पाहिजे.

Disclaimer – हा लेख केवळ सामान्य माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे ‘आरोग्य कल्याण’ यातून कोणताही दावा  करत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा.

Leave a Comment